LIVE STREAM

AmravatiamravatinewsLatest News

अमरावतीत अनधिकृत बॅनरवर मनपाची कडक कारवाई

अमरावती ; पि.आय.एल. १५५ अन्वये अनधिकृत बॅनर लावण्याबाबत मनाई केलेली आहे. सदर पि.आय.एल. च्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांचे आदेशान्वये झोन निहाय नोडल अधिकारी तसेच वार्ड अधिकारी नियुक्त केले असून कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बॅनर लागणार नाही याबाबत संबंधितास सक्त निर्देश दिले आहे. याकरिता झोन स्तरावर पथक गठीत करण्यात आले आहे. अनधिकृत बॅनर वर दैनंदिन कारवाई करण्यात येते. झोन क्र.१ ते ५ मध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे बॅनर लावण्याकरिता मागील आठ दिवसात तीनशे दहा परवानगी देण्यात आली आहे. तसेच ८०७ अनधिकृत बॅनर काढण्यात आले असून ४८००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मा. उच्च न्यायालयाने अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स होर्डिंग व कमानीबाबत संदर्भीय पीआयएल न. १५५/२०११ नुसार आदेश दिलेले आहेत. दि. ३१ जानेवारी २०१७ नुसार महाराष्ट्र मालमत्ता वीरूपन प्रतिबंध कायदा १९९५ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत तरतुदीनुसार कार्यवाही करणेस्तव महानगरपालिकेकडून अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शहरातील अधिकृत होर्डिंग बॅनर व कमानी काढण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत. त्यानुसार बाजार परवाना विभागातील अधिकारी व कर्मचारी सकाळी ६ वाजताच रस्त्यावर उतरले. या मोहिमेत शहरातील अनधिकृत होर्डिंग व बॅनर हटवण्यात आले.
शहरात होर्डिंग व बॅनर लावण्यासाठी परवानगी घ्यावी, असे मनपाने सुचित केलेले आहे. कसलीही परवानगी न घेता हे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे हे बॅनर काढून टाकण्यात आले. यापुढे अशा पद्धतीने बॅनर लावू नयेत अन्यथा दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.
याद्वारे अमरावती महानगरपालिका शहर हद्दीतील नागरिकांना सुचित करण्‍यात येते की, अमरावती महानगरपालिका हद्दीमध्‍ये विद्युत खांबे, झाडे, इलेक्ट्रिक डी.पी., रस्‍त्‍यालगतच्‍या भिंती शासकीय व खाजगी इमारती यावर बॅनर, पोर्स्‍टर, लीफलेट, जाहिरात बोर्ड, मोठे फ्लेक्‍स विनापरवानगी लावल्‍याचे आढळून येते सदरचे कृत्‍य हे नियमांचे उल्‍लंघन करणारे आहे. याबाबत अमरावती महानगरपालिकेमार्फत गंभीर दखल घेण्‍यात आलेली असुन महाराष्‍ट्र मालमत्‍तेच्‍या विरुपणास प्रतिबंध करण्‍याकरीता अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्‍यात येईल.
तात्‍पुरत्‍या जाहिराती लावण्‍याकरीता https://amravaticorporation.in या संकेत स्‍थळावर झोन निहाय रितसर अर्ज करुन परवानगी व QR कोड उपलब्‍ध करुनच जाहिराती लावण्‍यात याव्‍यात. तसेच प्रिंटींग एजन्‍सी / प्रतिष्‍ठानामार्फत छापण्‍यात येणारे प्रत्‍येक बॅनर्स, पोस्‍टर्स, फलकावर मुद्रक प्रकाशित करण्‍यापुर्वी महानगरपालिके मार्फत घेण्‍यात आलेली परवानगी तपासुन प्रकाशकाचे नाव सदर बॅनरवर छापण्‍यात यावे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!