LIVE STREAM

AmravatiCity CrimeLatest News

अहमदाबादहून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सवर कृषी विभागाच्या भरारी पथकाचा छापा! आढळून आले २५ लाखाचे बोगस बियाणे पॅकेट

अमरावती : अहमदाबाद येथून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गुजरात ट्रॅव्हल्सवर रविवारी सकाळी अमरावती येथील वेलकम पॉईंटजवळ कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. या छाप्यात ट्रॅव्हल्सच्या लगेज कंपार्टमेंटमध्ये बोगस बियाण्यांचा मोठा साठा आढळून आला असून, एकूण 2500 पॅकेट्समधील सुमारे 25 लाख रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बियाण्यांची वाहतूक विनापरवाना व बोगस स्वरूपाची होती. संबंधित बियाण्यांवर लेबलिंग व प्रमाणीकरण संदिग्ध होते. त्यामुळे कृषी कायद्यांचे उल्लंघन होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

परराज्यातून अवैध वाहतुकीचा संशय
या घटनेमुळे परराज्यातून अशा प्रकारे ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अवैध वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. ट्रॅव्हल्सच्या सामानात आणखी कोणते प्रतिबंधित किंवा अवैध साहित्य वाहून नेले जात आहे का? याची चौकशी आवश्यक असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत.

प्रवाशी असल्याने ट्रॅव्हल्सला परवानगी
छाप्याच्या वेळी ट्रॅव्हल्समध्ये सामान्य प्रवासीही असल्याने, तपासणी पूर्ण झाल्यावर ट्रॅव्हल्सला नागपूरच्या दिशेने मार्गस्थ होण्यास परवानगी देण्यात आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कृषी विभागाकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, जप्त बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!