LIVE STREAM

AkolaLatest News

मॅरेथॉन “रन फॉर सेफ्टी” साठी धावले महावितरणचे कर्मचारी

अकोला : “आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” या संकल्पनेला पुढे नेत महावितरणच्या अकोला परिमंडळातील शेकडो कर्मचाऱ्यांनी “रन फॉर सेफ्टी” मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्य अभियंता (प्र) अजय शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनचा शुभारंभ केला.

महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त १ ते ६ जूनदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. या उपक्रमाची सुरुवात आज १ जून रोजी “रन फॉर सेफ्टी” मॅरेथॉनद्वारे झाली. मॅरेथॉनसोबतच विद्यार्थी, ग्राहक आणि जनमित्रांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आणि ईमेलद्वारे ग्राहकांना विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

रूट व सहभाग:
मॅरेथॉनची सुरुवात अकोल्याच्या विद्युत भवन (रतनलाल प्लॉट) येथून झाली. यानंतर सिव्हील लाईन चौक – पोस्ट ऑफिस – सुंदराबाई खंडेलवाल टॉवर मार्गे पुन्हा विद्युत भवन येथे समारोप झाला.

या उपक्रमात अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, अजितपालसिंह दिनोरे, कार्यकारी अभियंता लिना नागपुरे, शशांक पोंक्षे, तसेच उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलेकर यांच्यासह अकोला परिमंडळातील तीनही जिल्ह्यांतील २०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!