LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

मोर्शीत महावितरणचा “सेफ्टी फॉर रन” मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोर्शी : महावितरणच्या वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि विद्युत सुरक्षा सप्ताह या पार्श्वभूमीवर मोर्शी शहरात “सेफ्टी फॉर रन” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन महावितरण मोर्शी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले होते.

या मॅरेथॉनमध्ये महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, लाईनमन, यंत्रचालक आणि बाह्य स्त्रोतांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्युत सुरक्षेचे जनजागरण आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला शहरवासीयांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रमुख उपस्थिती:
श्री. विजय कासट – कार्यकारी अभियंता, महावितरण मोर्शी
श्री. संदीप उमाळे – उपकार्यकारी अभियंता, महावितरण मोर्शी
सुरज मेश्राम – सहाय्यक अभियंता, शहर वितरण केंद्र
विक्रमादित्य तळस – सहाय्यक अभियंता, ग्रामीण वितरण केंद्र
प्रमोद बदुकले – सहाय्यक अभियंता, महावितरण मोर्शी
शहानवाज अन्सारी – सहाय्यक अभियंता, वितरण केंद्र हिवरखेड
विपुल भडांगे – शासकीय कंत्राटदार, महावितरण कंपनी मोर्शी

कार्यक्रमात महावितरणच्या विविध शाखांमधील सर्व लाईनमन, यंत्रचालक, कंत्राटी व बाह्य स्त्रोत कर्मचारी सहभागी झाले होते, यामुळे संपूर्ण विभागामध्ये एकात्मतेचा आणि सुरक्षिततेचा संदेश रुजला.

विद्युत सुरक्षेसाठी जनजागृती महत्त्वाची – महावितरण
महावितरणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश विजेच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती करणे हा होता. वीज ही आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग असली तरी तीचा सुरक्षित वापर केल्यासच अपघात टाळता येऊ शकतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!