LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

येवदा, वडनेरगंगाई भागातील ‘ब्ल्यूझोन’ क्षेत्रातील लेआऊट वर येणार गंडांतर !

दर्यापूर – पूर नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात अथवा क्षेत्रालगत लेआउट अंथरूण शासन नियमांची पायमल्ली करणाऱ्या ‘ब्ल्यूझोन’ क्षेत्रातील लेआउट वर आता गंडांतर येण्याची स्थिती आहे. तालुक्यातील येवदा, वडनेरगंगाई भागात मंजूर व प्रस्तावित लेआउटची अमरावतीचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. अशा संपूर्ण प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची देखील मागणी आहे.

दर्यापूर तालुक्यातील येवदा, वडनेरगंगाई क्षेत्रात काही विकासकांकडून जमीन विकसित करून तेथे बेकायदेशीररित्या लेआउट टाकण्यात आले आहे. शहानुर नदी, लेंडी नाला, बोर्डी नदी आदी नद्यांच्या पूरप्रवण क्षेत्रात, अथवा क्षेत्रालगत हे लेआउट अंथरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तिथे तयार होत असलेल्या लोकवस्तीला त्यापासून गंभीर धोका भविष्यात निर्माण होणार आहे. अशा सर्व ‘ब्ल्यूझोन’ क्षेत्रातील नियमबाह्य लेआउटची तक्रार भाजपचे पंकज कान्हेरकर यांनी महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांच्या क्षेत्रात असलेल्या लेआऊटवर त्यांच्या विकासकांवर गंडांतर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. येवदा व वडनेरगंगाई भागातील अशा सर्व व्यवहाराची चौकशी समिती नेमून चौकशी करण्याची मागणी देखील कान्हेरकर यांची आहे. त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!