वाठोडा शुक्लेश्वर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

भातकुली : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावामध्ये उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी गावातील मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन गावातून शांततेत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीमध्ये छोट्या चिमुकल्यांनी अहिल्यादेवींच्या वेशभूषेत सादर केलेल्या देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
डीजे, भजन-कीर्तन आणि “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या गजरात संपूर्ण वाठोडा नगरी दुमदुमून गेली.
उपस्थित मान्यवर:
प्रविण लोथे, संतोष महात्मे, अमोल महात्मे, अमोल गंधे, गजानन महात्मे, गोपाल महात्मे, सोपान महात्मे, पंडितराव घुरडे, राजु फुटाणे, सागर डाखोळे, सुधीर इसाळ, शैलेश घुरडे, मारुती ढोक यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष व तरुण मंडळींनी उपस्थित राहून उत्सवात सहभाग घेतला.
प्रतिनिधी – गजानन खोपे