LIVE STREAM

JalnaLatest News

Ambad News : पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील घटना

जालना : अंबड तालुक्यातील डोमलगाव गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गावातील दोन मित्र पोहण्यासाठी गावाजवळच्या गोदावरी नदीपात्रात गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यातील एक तरुण नदीत बुडून मृत्यूमुखी पडला, तर दुसरा तरुण नदीतून बाहेर पडून जीव वाचवू शकला.

मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर बाबुराव खराद (वय 21, रा. डोमलगाव, अंबड तालुका) असे आहे. शनिवारी दुपारी दोघे मित्र पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. पोहत असताना अचानक खोल पाण्यात गेल्याने ज्ञानेश्वरचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. त्याचा मित्र कसाबसा बाहेर निघाला आणि गावात धावत जाऊन घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पट्टीचे पोहणारे तरुण नदीत उतरले आणि सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून खराद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना वाढू लागतात, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाण्याच्या स्रोतांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!