गोकुळ येथे नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला अर्ध्या रात्री महसूल प्रशासनाची धडक कारवाई

नांदेड : माहूर तालुक्यातील गोकुळ नगर येथे अर्ध्या रात्री नदीपात्रातून वाळू चोरणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत एक मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार किशोर यादव यांच्या बदलीनंतर वाळू तस्कर सक्रीय झाल्याची माहिती मिळताच नायब तहसीलदार कैलास जेठे उर्फ महाकाल यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन पार पडले.
रात्रीच्या अंधारात नदीपात्रातून ट्रॅक्टर पकडला
दिनांक 1 रोजी महसूल पथकाला गोकुळ नगर परिसरात वाळू चोरीची कुजबूज मिळाली होती.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीत चंद्र दोंथुलां यांच्या मार्गदर्शनाखाली
नायब तहसीलदार कैलास जेठे, महिला तलाठी ज्योती दुर्योधन, मंडळ अधिकारी शंकर चंदनकर, तसेच
तलाठी अभिजीत कुडमते, सी. पी. बाबर, साहेबराव गावंडे, कोतवाल सागर हिवाळे व इतर कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात पाण्यात उतरून ट्रॅक्टर रंगेहाथ पकडला.
महाकाल जेठे यांची धाडसी कारवाई
नायब तहसीलदार कैलास जेठे हे आधीपासून वाळू तस्करांविरोधात आक्रमक भूमिका घेत असून,
या कारवाईत त्यांनी आणि महिला तलाठींनी जीवाची पर्वा न करता नदीपात्रात उतरत ही धाडसी मोहीम राबवली.
पकडलेले ट्रॅक्टर माहूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
महिला तलाठ्यांचा कडक इशारा
महिला तलाठी ज्योती दुर्योधन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“माझ्या अखत्यारित येणाऱ्या गावांमध्ये गौण खनिज तस्करी अजिबात खपवून घेतली जाणार नाही.”
जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पुढील कारवाई
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि
सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीत चंद्र दोंथुलां यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाकडून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार आहेत.
गावकऱ्यांनी माहिती दिल्यास वाळू तस्करांची नांगी ठेचली जाईल, असा इशाराही कैलास जेठे यांनी दिला आहे.