LIVE STREAM

Latest NewsYavatmal

पुसद तालुक्यात मोठी कारवाई : २०० पोत्यांचा खतसाठा जप्त, कृषी विभाग ऑनफिल्ड

यवतमाळ : खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस खत आणि बियाण्यांचा साठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नये म्हणून प्रशासनाने धडक मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुसद तालुक्यातील सावंगी गावानजीक मोठी कारवाई करत कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत खतांनी भरलेला ट्रक ताब्यात घेतला आहे.


गुजरातमधून आलेल्या ट्रकमधून २०० पोते जप्त

कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सावंगी परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानुसार संशयित ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचे अनधिकृत खत आढळून आले. ट्रक गुजरातमधील एका कंपनीचा असून त्यामध्ये एकूण २०० पोते अनधिकृत खत भरलेले होते.


सध्या बाजारात शेतकऱ्यांची खरेदीला गर्दी – बोगस खतांचा धोका

सध्या खरीप पेरणीपूर्व तयारीत शेतकऱ्यांकडून खत आणि बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. याचाच गैरफायदा घेत काही बोगस विक्रेते अनधिकृत खत आणि बियाण्यांची विक्री करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासन आणि कृषी विभागाने मिळालेल्या प्रत्येक तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले आहे.


कृषी विभाग सतर्क – आणखी कारवायांची शक्यता

कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस खत विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. पुसदसह संपूर्ण जिल्ह्यात तपासणी मोहिमा सुरू ठेवण्यात येणार आहेत.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!