LIVE STREAM

Accident NewsAkolaLatest News

Akola Accident News : अकोला जिल्ह्यातील वाघाडी नदीच्या पुलावरून भीषण अपघात; कार थेट खाली कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर

Akola Accident News : अकोल्यात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय. यामध्ये चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडे तोडून पुलाखाली कोसळली आहे. अकोल्यातल्या वाडेगाव बाळापुर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी आहे. वाहनातील कन्हैयासिंग ठाकूर (वय 54), विशाल भानुदास सोलनकर (वय 45) आणि सुनील शर्मा (वय 45) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नाव आहेत. तर आशिष कन्हैयासिंग ठाकूर हे गंभीर स्वरूपात जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या अकोल्याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वाघाडी नदीच्या पुलावरून थेट कार खाली कोसळली
पुढे आलेल्या माहितीनुसार, अपघातात मरण पावलेली व्यक्ती हे बाळापुर शहरातील रहिवासी आहे. दरम्यान, अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरील कुपटा नजीकच्या वाघाडी नदीच्या पुलावरून थेट कार खाली कोसळली आहे. वाडेगावकडून बाळापुरकडे जात असताना मध्यरात्रीच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलीये… मिळालेल्या माहितीनुसार, पातूर MH 30 ऐ-झेड 7557 क्रमांकाची कार थेट नदीच्या पुलावरील कठडे तोडून पलटी झाली आहे. घटनेची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरू केलीय. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकही जमेल होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!