LIVE STREAM

AkolaLatest News

अकोल्यात काँग्रेस नेते विजय कौसल यांचे बंधू संजय कौसल यांची हत्या,

अकोला : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान भाऊ आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अभियंता संजय कौसल (वय ६० वर्षे) यांची काल रात्री रणपिसे नगर परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बारा ज्योतिर्लिंग मंदिराजवळील एका अपार्टमेंटजवळ संजय कौसल यांच्यावर धारदार लोखंडी शस्त्राने डोक्यावर आणि छातीत गंभीर हल्ला करण्यात आला.

घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या संजय कौसल यांना तातडीने अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस तपासात समोर आले आहे की, हल्लेखोर सराईत गुन्हेगार असून तो याआधी तुरुंगात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. सोमवारी सायंकाळी त्याची संजय कौसल यांच्याशी भेट झाली. सुरुवातीला संवाद सुरू असतानाच, जुन्या वादातून हाणामारी उफाळून आली आणि आरोपीने लोखंडी टिकासारख्या शस्त्राने हल्ला केला.

पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली असून, या हत्येमागील नेमका कारणमीमांसा आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. अकोला शहर पोलिस तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!