LIVE STREAM

Latest NewsNanded

नांदेडमध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा नातेवाईकांचा आरोप

नांदेड : नांदेडमधील फोर्टीज स्टार हॉस्पिटल येथे प्रसूतीदरम्यान एका २० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या मृत्यूसाठी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत नातेवाईकांनी जोरदार आंदोलन छेडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहा तालुक्यातील उमरगा तांडा येथील आरती राठोड (वय २०) हिला प्रसूतीसाठी फोर्टीज स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काल रात्री तिची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. मात्र, यानंतर अतीरक्तस्राव सुरू झाल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

आज सकाळी आरतीचा मृत्यू झाला, आणि त्यानंतर रुग्णालयाने दाराला कुलूप लावून पलायन केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नातेवाईकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेत दोषी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नातेवाईकांचा आरोप आहे की, प्रसूतिवेदनेवेळी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आरतीचा मृत्यू झाला. या प्रकरणात तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने प्राथमिक चौकशी सुरू केली असून, लवकरच आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!