LIVE STREAM

AmravatiLatest News

“पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा :वंचित बहुजन आघाडीची आदिवासी विकास विभागावर धडक”

अमरावती : आदिवासी, पारधी आणि फासेपारधी समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या पारधी पॅकेज योजनेमध्ये एजंटांचा हस्तक्षेप आणि कमिशनखोरी मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने तीव्र भूमिका घेतली आहे.

आज अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती कार्यालयावर धडक देत वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे त्यांनी विभागातील एजंटगिरी त्वरित थांबविण्याची मागणी केली.

वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार,

“विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या योजना मूळ लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता एजंटमार्फत कमिशनखोरीचा खेळ सुरू आहे. हे प्रकार थांबवले नाहीत, तर व्यापक आंदोलन उभं केलं जाईल.”

  • निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या:
  • एजंटगिरी थांबवून थेट लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविणे.
  • पारधी पॅकेज योजनांची स्वतंत्र चौकशी करणे.
  • योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता ठेवणे.
  • आदिवासींच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करणे.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते, युवक आघाडीचे सदस्य आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विभागाने निवेदन स्वीकारले असून, योग्य कार्यवाही केली जाईल, असे प्राथमिक आश्वासन दिले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!