LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

मोर्शी पोलिसांनी जप्त केला लाखोंचा अवैध गुटखा शहरापाटोपाट ग्रामीण पोलिसांची गुटख्यावर धडक कारवाई

मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात गुटख्याच्या अवैध साठ्यावर मोठी कारवाई करत २ लाख ८५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

गुप्त माहितीच्या आधारे मोर्शी शहरातील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. या पथकात पीएसआय अमोल बुरकुल, स्वप्निल बायस्कर आणि छत्रपती करपते यांचा समावेश होता. कारवाईदरम्यान गुटख्याचा मोठा साठा आढळून आला असून, तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

गुटखा विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर त्याचा साठा आणि वितरण सुरू असल्याचे या कारवाईमुळे पुन्हा समोर आले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध घेण्यात येत असून, गुटखा माफियांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!