LIVE STREAM

AmravatiLatest News

शिवटेकडी येथे जीवन वाचवणारे प्राथमिक उपचार प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

अमरावती : असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया ८ जून ते १४ जून हे शल्यचिकित्सकांच्या सन्मानार्थ सर्जन आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. अहो रात्र रुग्णसेवा करणाऱ्या शल्यचिकित्सकांद्वारे या आठवडाभर विविध लोक उपयोगी उपक्रम केले जात आहे. या आयोजनात
या अंतर्गत रविवार दि.८ जून रोजी अमरावती येथील शिवटेकडी येथे येणाऱ्या लोकांसाठी प्राथमिक जीवनरक्षक उपचार (Basic Life Support – BLS) प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय विद्यार्थ्यांसह इतर आरोग्य सेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यशाळेच्या सुरवातीला असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया चे कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेंद्र गनेरिवाल यांनी प्रस्तावना संदेश दिला. सम्पूर्ण सप्ताह भर रोज होणाऱ्या लोक उपयोगी कार्यक्रमांची त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. त्यात प्रामुख्याने रक्तदान शिबीर , स्तन कॅन्सर वर मार्गदर्शन व मोफ़त तपासणी शिबीर , अवयव दान विषयावर मार्गदर्शन शिबीर ,इत्यादी चा समावेश आहे.

शिवतेकडी येथे झालेल्या प्रशिक्षणात कार्डिओपल्मनरी रिससिटेशन (CPR), श्वासोच्छवास अडथळा निर्मूलन, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला मदत करण्याच्या पद्धती याविषयी सुविख्यात भूळतज्ञ आय. एम .ए, अमरावती च्या सचिव तसेच डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील भूळतज्ञ विभाग प्रमुख व अमरावती सोसायटी ऑफ एनेस्थेसीओलॉजिस्ट च्या अध्यक्षा डॉ. राधा सावदेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सहभागींचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. अशा कार्यशाळांमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास होतो, असे आयोजकांनी सांगितले.
या कार्यशाळेत शेकडो च्या संख्येने उपस्थित लोकांनी स्वतः पुतळ्यावर सराव केला.
या प्रसंगी डॉ. संदीप दानखडे यांनी आयोजकांचे कौतुक करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीरज मुरके यांनी आज च्या व्यस्त जीवनात अश्या कार्यशाळेची अत्यंत गरज असल्याचे सांगितले व आयोजकांचे अभिनंदन केले. या वेळी त्यांनी उपस्थितांना डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील उपलब्ध सुविधांबद्दल माहिती दिली. विशेष म्हणजे की डॉ. नीरज मुरके यांनी अवयवदान करण्याचा संकल्प देखील घेतला.
या प्रसंगी प्रकल्प प्रमुख डॉ.जयश्री इंगोले, डॉ. सुरेश सावदेकर ,डॉ. अनिल दारोकार, डॉ.संजीव पाठक , डॉ. संगीता कडू, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. उषा देशमुख, श्री वैभव कोकाटे, श्री निखिल तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.

अश्या मार्गदर्शन कार्यशाळेची अत्यंत गरज असल्याने आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्रशिक्षक, आयोजक व सहभागींना धन्यवाद देण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!