पुराणा शहर पोलिसांची मोठी कारवाई – तीन दुचाकी चोरटे गजाआड

अकोला – अकोला शहरातील वाहन चोरी प्रकरणांवर कठोर कारवाई करत पुराणा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पुन्हा एकदा मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी तीन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून अंदाजे २ लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
यापूर्वी काही दिवसांपूर्वी पुराणा शहर पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणात विशेष मोहिम राबवून ९ चोरीच्या गाड्या जप्त केल्या होत्या. त्याच प्रकरणातील एका आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास करत आणखी तिघांना अटक केली.
अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
शेख उमर फुरकान अब्दुल सलाम (रा. हमजा प्लॉट, अकोला)
शेख शहजाद अब्दुल अहद (रा. जमजम कॉलनी, जलगाव जामोद, बुलढाणा)
शेख अलीम शेख सलीम (रा. अकोट)
या तिघा आरोपींनी अकोट फाइल, पुराणा शहर आणि सिटी कोतवाली हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण तीन दुचाकी वाहनं जप्त केली असून त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख रुपये इतकी आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि एसडीपीओ सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली थानेदार नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात रवींद्र कारणकर, श्रीकांत पवार, पंकज उपाध्याय, सागर शीरसाठ आणि पवन डाबलकर यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की अकोला पोलीस वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांबाबत सतर्क असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत आहेत. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत, तसेच कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी – गुलाम मोहसिन, अकोला