LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

बडनेरात आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांचा भव्य नागरी सत्कार

बडनेरा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश महासचिव व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांचा संयुक्त नागरी सत्कार सोहळा बडनेरा विकास कृती समितीच्यावतीने महावीर भवन, बडनेरा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात बडनेरातील विविध सामाजिक, व्यापारी व राजकीय संघटनांनी खोडके दाम्पत्याचा जाहीर सत्कार केला.

व्यासपीठावर आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, भाजप प्रवक्ते कुळकर्णी, ज्येष्ठ व्यापारी अग्रवाल, माजी नगरसेवक पापे ठाकूर, जावेद मेनन, लकी नंदा, अयुब खान, राजेंद्र दारोकार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

गटबंदीचे संकेत आणि स्पष्ट भूमिका
या सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार संजय खोडके यांनी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीसोबत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे संकेत दिले. मात्र, बडनेरा विधानसभा मतदारसंघावर अधिराज्य गाजवणाऱ्या आमदार रवी राणा यांच्या पक्षासोबत जर भाजप राहणार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षावर एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केल्याचा आरोप करताना, या पार्श्वभूमीवर बडनेरात त्या समुदायात अस्वस्थता निर्माण झाल्याचा उल्लेख केला. त्यामुळेच या कार्यक्रमात त्या समुदायाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची ठळक उपस्थिती दिसून आली.

कार्यक्रमात राजकीय घडामोडींची झलक
सत्काराला उत्तर देताना आमदार संजय खोडके यांनी बडनेरामधील आपल्या राजकीय प्रवासाच्या आठवणी उलगडल्या. त्यांनी यावेळी सांगितले की, कार्यक्रमाच्या आयोजकांनी भाजप प्रवक्त्यांना निमंत्रण द्यावे की नाही, याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली होती, यावरून आगामी निवडणुकांतील गटबंदी संदर्भात आयोजकांमध्येही संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले.

आमदार सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय खोडके यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे, असे सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!