LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

शेतात सापडला भलामोठा अजगर, सर्पमित्रांनी वाचवला जीव”

अमरावती : वडगाव माहोरे येथील एका शेतामध्ये आज सकाळी एक भलामोठा अजगर आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली. मात्र सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे या अजगराचा सुरक्षित रेस्क्यू करण्यात यश आलं आहे.

शेतकरीस आज सकाळी आपल्या शेतात काम करत असताना झुडपांमध्ये हालचाल जाणवली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांनी एका मोठ्या अजगराला coil झालेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्यांनी तात्काळ स्थानिक सर्पमित्र विशाल कांबळे यांना संपर्क केला.

विशाल कांबळे यांच्यासोबत ऋत्विक कांबळे आणि बंटी हातमोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तिघांनी अत्यंत कुशलतेने आणि दक्षतेने अजगराचा रेस्क्यू केला. काही वेळ चाललेल्या प्रयत्नांनंतर अजगराला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडण्यात आले आणि निसर्गात योग्य स्थळी सोडण्यात आले.

सर्पमित्रांनी सांगितले की, हा अजगर सुमारे ८ फूट लांबीचा असून निरुपद्रवी आहे. तो केवळ अन्न शोधण्यासाठी शेतीच्या परिसरात आला असावा.

सर्पमित्र विशाल कांबळे यांनी जनतेस आवाहन केलं की,

“साप दिसल्यास घाबरून न जाता तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा. साप मारणे हे कायद्याने गुन्हा आहे, तसेच ते निसर्गाचं महत्वाचं चक्र सांभाळतात.”

या रेस्क्यू ऑपरेशनमुळे गावकऱ्यांनी सर्पमित्रांच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले आहेत. हे उदाहरण वन्यजीव संवर्धन आणि मानवी सहजीवनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल म्हणता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!