LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावती : सक्कर साथ चौक फूटीर खिड़की परिसरातील डीपीला आग

अमरावती : सक्कर साथ चौकातील फूटीर खिड़की परिसरात आज सकाळच्या सुमारास अचानक वीज वितरण पेटी (DP) ला आग लागल्याची घटना घडली. यामुळे परिसरात काही वेळासाठी खळबळ माजली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दमकल विभागाच्या तत्पर कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

मेनलाइन तातडीने बंद करून धोका टाळला
घटनेची माहिती मिळताच जवळील जवाहर गेट सेन्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मेन लाइन बंद करण्याची सूचना दिली, त्यानंतर अधिकार्‍यांनीही तातडीने लाईन बंद करून मोठी दुर्घटना टाळली.

तत्परतेमुळे टळली मोठी हानी
घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या गाडीने वेळेत पोहोचून आग आटोक्यात आणली. डीपीजवळ वाहनांची गर्दी असतानाही प्रसंगावधान राखत तात्काळ कारवाई करण्यात आली.

स्थानीय नागरिकांचा प्रतिसाद
या घटनेबाबत स्थानिकांनी वीज विभाग आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून, अशा ठिकाणी पूर्वतयारी आणि नियमित देखरेखीची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!