मनपास्तरीय पाठयपुस्तक वितरणाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते उदघाटन
अमरावती – समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय,जि.प.मनपा, खाजगी व अंशता अनुदानीत शाळांना मोफत पाठयपुस्तक वितरण करण्यात येत असते.त्याच अनुषंगाने महानगरपालिका परीक्षेत्रातील एकुण २०७ शाळांना मनपा स्तरावरुन पाठयपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये मराठी हिंन्दी उर्दु व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. एकुण ४६५९० विदयार्थीना याचा लाभ मिळणार आहे.२ लाख ९०हजार पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्या वाटपाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते म.न.पा.मराठी शाळा क्र. १३ चपराशीपुरा व म न पा उर्दु शाळा क्र.०६ चपराशीपुरा येथुन दि. १० जुन रोजी करण्यात आला आहे. शहरातील सर्व शाळांना शाळा शुभारंभ अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक प्राप्त होतील याप्रकारचे नियोजन महानगरपालिका शिक्षण विभागमार्फेत करण्यात आले आहे. या शुभारंभा प्रसंगी अमित डेंगरे सिस्टीम मॅनेजर हे आर्वजुन उपस्थित होते. या पाठयपुस्तक वितरणाचे काम डॉ.प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी म.न.पा. यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे. या शुभारंभ प्रसंगी गोपाल कांबळे केंद्रसमन्वयक, पंकजकुमार सपकाळ सहायक क्रार्यक्रम अधिकारी, संजय बेलसरे, योगेश राणे, निजामुददीन काझी, शुभांगी सुने, सुषमा दुधे विषयतज्ञ या उपस्थित होते.