शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा संकल्प; स्वच्छतेच्या या चळवळीत प्रत्येकाने आपले योगदान द्यावे : खासदार बलवंत वानखडे

अमरावती : खासदार बलवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.१०/०६/२०२५ रोजी अमरावती शहरातील कचरा, अस्वच्छता आणि प्रत्येक भागातील साचलेले घाणीचे साम्राज्य याबाबत आढावा बैठक विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली होती.खासदार बलवंत वानखडे व माजी आमदार डॉ.सुनिल देशमुख यांनी महानगरपालिकेला भेट दिल्याबद्दल त्यांचा यावेळी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार केला. यावेळी खासदार महोदयांनी अमरावती शहरातील कचरा, अस्वच्छता आणि प्रत्येक भागातील साचलेले घाणीचे साम्राज्य या विषयांवर सविस्तर चर्चा करुन संबंधीत विभागांना निर्देशित करण्यात आले.
या बैठकीत पावसाळापुर्वीचे उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे याबाबत मोहीम हाती घ्यावी असे निर्देश खासदारांनी दिले.वार्डा-वार्डातील साफ सफाई, नाली व नाले सफाई, गटार साफ सफाई करण्याचे निर्देश यावेळी खासदारांनी दिले. सदर परिसरातील नाल्यांची साफ सफाई बाबत खासदार महोदयांनी आढावा घेतला. सदर परिसरातील नाल्या साफ सफाई करण्याची कार्यवाही करणे सुरु असून नाल्याची सफाई योग्य पध्दतीने करण्याचे निर्देश दिले. सदर परिसरातील निघणा-या कच-याचे नियोजन करुन सदर तांत्रीक पध्दतीने कच-याचे विल्हेवाट लावावी. नाल्यात असा कचरा फेकला असल्यास त्यावर प्रशासकीय कार्यवाही त्वरीत करावी.
प्रत्येक अधिका-याने समन्वयाने काम करावे. कर्मचा-यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थीतरित्या पार पाडावी. जनतेचे कामे वेळोवेळी करुन त्यांना सहकार्य करावे.
या बैठकीत अमरावती शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर मिलींद चिमोटे, विलास इंगोले, अशोक डोंगरे, वंदना कंगाले, माजी नगरसेवक बाळासाहेब भुयार, प्रदिप हिवसे, मुन्ना राठोड, प्रमोद पांडे, रफीक पत्रकार, सलिम बेग, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, भैय्या साहेब पवार, अधिकारी, पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.