Latest NewsMaharashtra PoliticsNanded
क्या हुआ तेरा वादा?” म्हणत ठाकरे सेनेचा बैलगाडी-ट्रॅक्टर मोर्चा – महायुतीच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह

नांदेड : महायुती सरकारच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड आणि किनवट भागात ठाकरे सेनेच्या वतीने भव्य बैलगाडी-ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. “क्या हुआ तेरा वादा?” या टॅगलाइनखाली शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात शेकडो बैलगाड्या, ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच मुलींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन, बेरोजगारी हटवणे, ऊस दरवाढ, सिंचन योजना अशा अनेक वचने देण्यात आली होती. मात्र, सत्तेवर येऊन दीड वर्ष उलटून गेले तरी एकही आश्वासन पाळले गेलेले नाही, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.