LIVE STREAM

gold rateLatest News

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोनं पुन्हा महागलं; आज काय आहे 24 कॅरेटचा भाव, जाणून घ्या

Gold Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोनं पुन्हा एकदा वधारलं आहे. दोन दिवसांच्या पडछडीला लगाम मिळाला आहे. सोनं आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सोनं प्रतितोळा 98,400 रुपयांवर पोहोचले आहे. तर, चांदी 93 रुपयांनी वाढून 106842 रुपये प्रतिकिलोवर व्यवहार करत आहे. कमोडिटी बाजारात चांदीच्या सलग पाच दिवसांच्या उच्चांकी वाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळं चांदीची किंमत 37 डॉलरने खाली घसरली आहे. सोनंदेखील3,340 डॉलरने नरमले आहे. भारतात गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घट झाली होती. मात्र आज 11 जून रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 98,400 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याचा दरात 750 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 90,200 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 610 रुपयांची वाढ झाली असून 73,800 रुपयांवर पोहोचले आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 90,200 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 98,400 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 73,800 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,840 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,020 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,380 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 78,720 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 72,160 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59,040 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट-90,200 रुपये
24 कॅरेट- 98,400 रुपये
18 कॅरेट-73,800 रुपये

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!