LIVE STREAM

Latest NewsNagpur

नागपूरच्या वाहतूक समस्यांवर ‘स्मार्ट’ उपाय! IITMS प्रणालीमुळे शहरात ट्राफिकचे नवे युग

नागपूर : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी, नियमभंग आणि अपघात यावर आता अत्याधुनिक उपाय योजला जात आहे. शहरात सध्या कार्यान्वित होत असलेली IITMS (Integrated Intelligent Traffic Management System) प्रणालीमुळे ट्राफिक व्यवस्थापनात क्रांतिकारी बदल घडणार आहेत.

AI बेस्ड ट्राफिक सिस्टीम आता नागपूरमध्ये
या प्रकल्पाअंतर्गत शहरातील जुन्या ट्राफिक सिग्नल्सचे आधुनिकीकरण आणि सिस्टम इंटिग्रेशन सुरू झाले आहे:

काही ठिकाणी जुने सिग्नल पूर्णपणे बदलण्यात आले
काही ठिकाणी सिग्नल्सना AI बेस्ड मॉड्युल्सशी लिंक करण्यात आले आहे

ट्राफिक नियमभंगावर ‘ऑटोमॅटिक नजर’
IITMS प्रणालीद्वारे खालील प्रकारांचे ऑटो डिटेक्शन होणार:
रेड सिग्नल जंप करणे
हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे
रॉंग साइड ड्रायव्हिंग
याशिवाय, शहरातील २४ महत्त्वाच्या रस्त्यांवर स्पीड वायलेशन रोखण्यासाठी रडार टेक्नॉलॉजी बसवण्यात आली आहे.

नियंत्रणासाठी आता AI ची साथ
यापूर्वीपर्यंत नागपूरमधील ट्राफिक नियंत्रणासाठी पोलीस व CEOC कंट्रोल रूमवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता AI च्या सहाय्याने ही जबाबदारी अधिक प्रभावी, जलद आणि अचूक पद्धतीने पार पडणार आहे.

ACP माधुरी बाविस्कर यांचे प्रतिपादन
CITY NEWS शी बोलताना ACP माधुरी बाविस्कर यांनी सांगितले:

“IITMS प्रकल्प नागपूरच्या नागरिकांच्या वाहतूक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रणालीमुळे लवकरच ट्राफिकमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील.”

शहरातील नागरिकांना दिलासा
वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत असतानाच, या प्रणालीमुळे शिस्तबद्ध वाहतूक संस्कृतीला चालना मिळणार आहे. नागपूर हे देशातील स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळवत असताना ही प्रणाली एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!