LIVE STREAM

Latest NewsNagpur

नागपूर गुन्हे शाखेची धडक कारवाई: दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा, 14 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त!

नागपूर : नागपूर शहरात नुकतीच घडलेली दोन गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं आता उलगडली आहेत. गुन्हे शाखा युनिट ०४ च्या प्रभावी तपासामुळे घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींना अटक करून सुमारे १४ लाख ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे
अजनी पोलीस ठाणे:
गुन्हा क्र. 285/2025, कलम 331(4), 331(3), आणि 305(A) BNS अंतर्गत घरफोडीचा गुन्हा नोंद.

हुडकेश्वर पोलीस ठाणे:
गुन्हा क्र. 367/2025, कलम 303(2) BNS अंतर्गत दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद.

गुन्हे शाखेचा तपास – आरोपींच्या मुसक्या आवळल्या
या दोन्ही गुन्ह्यांतील तपासाची सूत्रं एकत्र करत गुन्हे शाखा युनिट ०४ ने दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

अटक आरोपींची नावे:

सुमित पवन सोनटक्के (वय २४), रा. अजनी रेल्वे कॉटर्स, नागपूर
विधी संघर्ष बालक – २ बालकांचा समावेश

जप्त मुद्देमाल
गुन्ह्यांमध्ये वापरलेले व चोरीला गेलेले साहित्य खालीलप्रमाणे जप्त करण्यात आले आहे:
पिवळ्या धातूचे दागिने: 167.04 ग्रॅम – किंमत ₹13,39,200
पांढऱ्या धातूचे दागिने: 400 ग्रॅम – किंमत ₹45,000
चोरीस गेलेली दुचाकी (Splendor – MH 31 EW 4121): किंमत ₹20,000
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: ₹14,04,200

पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू
संपूर्ण वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही आरोपींना अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ०४ च्या वेगवान आणि ठोस कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!