नागपूर पाचपावलीतील चोरीप्रकरणाचा उलगडा – दोन सराईत चोरटे अटकेत, 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : आज सकाळी पाचपावली पोलिसांच्या गस्तीदरम्यान दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीची ई-रिक्षा आणि स्कूटर जप्त करण्यात आली आहे. ही कामगिरी पाचपावली पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली.
संशयितांची नावे हर्षद दामोदर बोथले (रा. रामनगर, चंद्रपूर) आणि अल्पेश प्रशांत कोटागिरी (रा. बुद्धनगर, पाचपावली) अशी आहेत. हे दोघे एका मॅक्सीमध्ये चोरीची प्लेझर स्कूटर घेऊन जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आले.
तपासाचा धक्कादायक उलगडा:
प्लेझर स्कूटर: सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या तक्रारीतील असल्याचे निष्पन्न
ई-रिक्षा (MH 40 BF 1908): सुमारे पंधरा दिवसांपूर्वी टेका नाका परिसरातून चोरीला गेलेली
गुन्हेगारी पार्श्वभूमी: हर्षद व अल्पेश यांच्यावर यापूर्वी रामनगर, चंद्रपूर व पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
अधिक चौकशीत आरोपींनी स्वीकारले की, त्यांनी मौजमजा व हौसेपायी ही वाहने चोरली होती. हर्षद बोथले सध्या कोणतीही नोकरी करत नसून, बेकारपणातच इकडेतिकडे फिरत असल्याने पोलिसांना संशय आला.
जप्त मुद्देमाल:
प्लेझर स्कूटर
ई-रिक्षा
एकूण किंमत: अंदाजे ₹1,30,000
तपास पथकातले योगदान:
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. ज्ञानेश्वर भोगे, पो.ह. इम्रान शेख, रमेश मिनेवार, एनपीसी अनिल धुळे, पो.कॉ. राहुल चिटखेर, संतोष शेंद्रे व गगन यादव यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.