मुख्यमंत्री अकोला दौऱ्यात प्रहार कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सकाळीच ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर पुन्हा एकदा प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री भाषणानंतर ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला.
“बच्चू भाऊंच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे!”
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर एका कार्यकर्त्याने बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत ठिय्या आंदोलन सुरु केलं. त्यावेळी त्या कार्यकर्त्याने जोरदार घोषणा देत “शेतकऱ्यांच्या मागण्या, कामगारांच्या हक्कांसाठी आवाज द्या!” अशी भूमिका घेतली.
पोलिसांनी तत्काळ घेतलं ताब्यात
कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आला होता. आंदोलन सुरु होताच पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित प्रहार कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
सकाळपासूनच हालचालींवर नजर
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळीच प्रहार जनशक्ती पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईत अटक करण्यात आली होती. त्यानंतरही कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न पोलिसांसाठी आव्हान ठरला.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद
गुरूकुंज मोझरी येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा वाढत चालला आहे. अकोल्यातील या घटनाक्रमातून या मागण्यांचा दबाव सरकारवर वाढत असल्याचे दिसत आहे.
प्रतिनिधी – मुकेश ढोके