LIVE STREAM

AkolaLatest News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोल्यात नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन

अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अकोला जिल्ह्यातील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमात राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात नव्या इमारतीचा आढावा घेत विकासाच्या विविध योजनांचे उदघाटन आणि भूमिपूजन पार पडले.

अकोल्याच्या विकासाला गती देणारी पायाभूत सुविधा
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून, यामुळे जिल्हा प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान आणि कार्यक्षम होणार आहे. कार्यालयात डिजिटल व कागदविरहित प्रशासनाची दिशा ठेवण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास – “अकोल्याचा विकास ही आमची प्राधान्यक्रमाची जबाबदारी”
उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,

“अकोला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि लोकांच्या सोयीसाठी या कार्यालयाचे स्वप्न सत्यात उतरले आहे. जिल्हा प्रशासनाला आता अधिक आधुनिक आणि कार्यक्षम पायाभूत सुविधा मिळाल्या असून, ही इमारत हा विकासाचा एक नवा टप्पा आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!