अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ‘मिड-डे’ वृत्तपत्राची जाहिरात चर्चेत – विचित्र योगायोग खळबळ

12 जून रोजी दुपारी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबादहून उड्डाण करताच काही सेकंदांत हे विमान शहराच्या मेडिकल कॉलेज वसतिगृहावर कोसळले, ज्यामध्ये 242 प्रवाशांपैकी फक्त एकच प्रवासी वाचला.
या अपघातानंतर एक विचित्र आणि थरकाप उडवणारा योगायोग समोर आला आहे. ‘मिड-डे’ या लोकप्रिय इंग्रजी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर त्या दिवशी प्रसिद्ध झालेली एक जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जाहिरातीत फादर्स डे वीकेंडसाठी किडझानिया संस्थेची जाहिरात होती, ज्यामध्ये एका इमारतीच्या दर्शनी भागातून एअर इंडियाचे विमान थेट बाहेर येत असल्याचे दृश्य छापले गेले होते. विशेष म्हणजे, अपघातातही ड्रीमलायनरचे अवशेष मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळताना दिसले, जे त्या जाहिरातीतील प्रतिमेशी भ eer’रूप साम्य दर्शवत आहे.
हे साम्य इतकं अचंबित करणारं होतं की, अनेकांनी या जाहिरातीला ‘अभद्र योगायोग’ म्हटलं आहे. काही नेटिझन्सने या जाहिरातीला ‘मनोवैज्ञानिक धक्का देणारी’ आणि ‘अप्रत्याशित भविष्यवाणी’ म्हणूनही संबोधलं आहे.