LIVE STREAM

Latest NewsNanded

तरोडा नका बाजारात शेतकऱ्याला गुंडांकडून जबर मारहाण, ६ आरोपींवर गुन्हा दाखल

नांदेड – शहरातील तरोडा नका परिसरात भाजीपाला विक्रीस आलेल्या शेतकऱ्याला सहा गुंडांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, संपूर्ण प्रकार सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

लिंबगाव येथील शेतकरी संदेश पोहरे हे भाजीपाला विक्रीसाठी तरोडा नका परिसरात आले होते. त्याच दरम्यान बाजारातील सहा जणांच्या टोळीने त्यांना जबरदस्तीने पैसे हिसकावून घेतले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाले असून, घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश पवार याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत असून, बाजार परिसरातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतकऱ्याच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!