विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्राच्यावतीने विचारशलाका तत्त्वज्ञान विशेषांकाचे 18 ला प्रकाशन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अभ्यास केंद्राच्यावतीने लातूर येथून प्रकाशित होणा-या वैचारिक साहित्याला वाहिलेल्या ‘विचारशलाका’ या नियतकालिकेच्या महानुभाव तत्त्वज्ञान विशेषांकाचे विमोचन 18 जून रोजी दुपारी 4.00 वा. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या शुभहस्ते होणार आहे. कुलगुरू कार्यालयात हा विमोचन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, लातूर येथून प्रकाशित होणा-या त्रैमासिक विचारशलाकाचे संपादक प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार, अतिथी संपादक प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे उपस्थित राहणार आहेत. महानुभाव तत्त्वज्ञानावर आधारित विचारशलाका या तत्त्वज्ञान विशेषांकामुळे अभ्यासक तथा जिज्ञासूंना महत्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे, असे महानुभाव अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. महंत सोनपेठकर यांनी सांगितले.