LIVE STREAM

AkolaLatest News

अकोला बाळापुर येथे विना नंबर प्लेट पिकअप गाडी स्वस्त धान्य तांदळासह जप्त,

अकोला : बाळापुर पोलिसांनी पारस येथील स्वस्त धान्य दुकानातून बेकायदेशीररित्या वाहतूक होत असलेल्या तांदळाचे कट्टे घेऊन जाणारी एक विना नंबर प्लेटची पिकअप गाडी गुप्त माहितीच्या आधारे पकडली. ही गाडी शेगावकडे जात असल्याची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून ही धान्याने भरलेली गाडी पकडून पोलिस स्टेशनमध्ये आणली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे बाळापुर पोलिसांचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरत असले तरीही, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांमध्ये जिल्हा व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानदारांना क्लीन चीट दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे रेशन माफियांचं धाडस वाढल्याचं चित्र सध्या समोर आलं आहे.

  • पुढील तपासाच्या दिशेने महत्वाचे प्रश्न :
    पकडण्यात आलेला तांदूळ कोणत्या दुकानातील आहे?
  • हा तांदूळ कोणत्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून खरेदी केला गेला?
  • त्या खरेदीसाठी वैध बिले किंवा पुरावे आहेत का?

ही वाहतूक करण्यासाठी तहसील कार्यालय अथवा खरेदी-विक्री केंद्रांची कोणती परवानगी घेण्यात आली होती का?

स्थानिक नागरिकांचा सवाल :
“पुरवठा विभाग यावेळी खरंच कडक कारवाई करणार की पुन्हा एकदा रेशन माफियांना क्लीन चीट दिली जाणार?”

बाळापुरवासीयांचे संपूर्ण लक्ष आता या प्रकरणाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. जर यावेळीही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!