LIVE STREAM

Latest NewsNanded

गटविकास अधिकारी कांबळे यांना निरोप, तर टाकरस यांचे स्वागत

 श्रीक्षेत्र माहुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांची प्रशासकीय बदली हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे झाल्याने त्यांना निरोप, तर त्यांचे जागी महागाव जि. यवतमाळ येथून आलेले गटविकास अधिकारी टी. एच.टाकरस यांचे स्वागत हा कार्यक्रम दि. 12 जून रोजी दु. 1 वा.पंचायत समितीच्या कै.वसंतराव नाईक सभागृहात पार पडला.
             बदलीवर गेलेले गटविकास अधिकारी सुरेश कांबळे व त्यांच्या जागी नियुक्ती मिळालेले टी. एस. टाकरस यांचा ग्रामसेवक संघटना,रोजगार सेवक संघटना व सरपंच संघटनेसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी सभापती नामदेव कातले, किसन सुंकावार, नागोराव मडावी, हाजी उस्मानखान, माजी सदस्य किसन राठोड, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख यश खराटे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!