गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना निरोप, टी. एच. टाकरस यांचे श्रीक्षेत्र माहुर येथे स्वागत

माहुर : श्रीक्षेत्र माहुर पंचायत समितीत गटविकास अधिकारी पदाच्या प्रशासकीय बदल्या अंतर्गत सुरेश कांबळे यांची बदली सेनगाव (जि. हिंगोली) येथे झाली असून, त्यांच्या जागी टी. एच. टाकरस यांची महागाव (जि. यवतमाळ) येथून नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त 12 जून रोजी दुपारी 1 वाजता पंचायत समितीच्या कै. वसंतराव नाईक सभागृहात निरोप व स्वागत समारंभ पार पडला.
गौरव सोहळा मोठ्या उत्साहात :
कार्यक्रमात ग्रामसेवक संघटना, रोजगार सेवक संघटना, सरपंच संघटना व कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्गाने दोन्ही अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार केला.
- कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती :
माजी सभापती नामदेव कातले - किसन सुंकावार, नागोराव मडावी
- हाजी उस्मानखान, माजी सदस्य किसन राठोड
- युवा सेनेचे जिल्हा प्रमुख यश खराटे
यांच्यासह इतर अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशासन आणि कर्मचारी यांचा पुढाकार :
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पंचायत समितीच्या सर्व विभागांतील कर्मचारी, अधिकारी आणि सेवकांनी परिश्रम घेतले. सुरेश कांबळे यांनी कार्यकाळात केलेल्या विकासात्मक कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले, तर नव्याने नियुक्त झालेले टी. एच. टाकरस यांच्याकडून ग्रामविकासाच्या क्षेत्रात अधिक सक्षम योगदानाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.