बडनेरा येथे भव्य रोजगार मेळावा: २२५ तरुणांना तात्काळ नोकरी!
बडनेरा : बडनेरा येथे एस्सेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 225 बेरोजगार आणि सुशिक्षित विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये तात्काळ रोजगाराची संधी मिळाली.
श्रीमती अंजलीबाई लांडे शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित एस एल औद्योगिक प्रशिक्षण संस्था गेल्या सहा वर्षांपासून असे मेळावे नियमितपणे आयोजित करत असून, शेकडो विद्यार्थ्यांना यामार्फत रोजगार मिळवून दिला आहे. यंदाच्या मेळाव्यात नागपूर, अमरावती, नाशिक, जालना आणि संभाजीनगर येथील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी थेट मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान केली.
- मेळाव्याचे ठळक वैशिष्ट्ये :
225 विद्यार्थ्यांना ऑन-द-स्पॉट रोजगार - पदवीधर, आयटीआय व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
- नामांकित कंपन्यांकडून थेट नियुक्ती
- विनामूल्य सहभाग – समाजाभिमुख उपक्रम
प्रमुख उपस्थित मान्यवर :
या रोजगार मेळाव्याला संस्थाध्यक्ष प्रशांत लांडे, स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष अजय जैस्वाल, मुस्ताक शेख, सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर, मतदार राजचे सिद्धार्थ बनसोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यशस्वी आयोजनामागील परिश्रम :
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्राचार्य भूषण दहिकर, प्रा. अमोल मिलके, सुनील टुले, अभिजीत लांडे, अतुल दिघाडे, मोहम्मद जमीर, अक्षय काळे, स्वप्नील दारोकार, वतन ठाकूर, विष्णू लांजूडकर, सुरज अंबाडकर, विनय केने, मुकेश बारपेठे यांचा मोलाचा वाटा होता.
संस्थाध्यक्ष प्रशांत लांडे यांची प्रतिक्रिया :
“शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगार मिळवणे हे विद्यार्थ्यांसाठी एक मोठं आव्हान असतं. आमची संस्था हे आव्हान सोडवण्यासाठी प्रतिबद्ध आहे. रोजगार मेळाव्यामुळे अनेक घरांमध्ये नवी आशा निर्माण