LIVE STREAM

Latest Newsmelghat

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू – आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते ५ लाखांची आर्थिक मदत

हरिसाल : हरिसाल परिसरात काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मन्नू बाबला जावरकर (वय ६० वर्षे) यांच्या कुटुंबाला आज आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते मयत जावरकर यांच्या पत्नी सुकराय मन्नू जावरकर यांना ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

ही मदत वनविभागामार्फत करण्यात आली असून, या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास आप्पा पाटील, शैलेश म्हाला, गजानन सुळसकर, रवी नवलाखे, गणेश येवले, द्वारकाप्रसाद मेटकर, रामू भारवे, आकाश खैरकर, कुणाल काळे, तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी जतकर, वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल धाईत, वनपाल धुमाळे, सराटकार, वानखडे आदी अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. केवलराम काळे यांनी या दु:खद प्रसंगी जावरकर कुटुंबाचे सांत्वन करताना वन्यजीव हल्ल्यांच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासन आणि वनविभागाने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!