LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

अचलपूरमध्ये मायलेकरांचा करुण अंत, गावात शोककळा.हृदयद्रावक! चमक बुद्रुक येथे कुलरच्या धक्क्याने आईसह दोन चिमुकले गतप्राण.

अचलपूर : अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक गावात शनिवारी सायंकाळी एक हृदयविदारक घटना घडली. घरात सुरू असलेल्या कुलरला शॉक लागून आईसह तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

गावातील लक्ष्मण कासदेकर हे पत्नी सुमती (वय ३८) आणि दोन मुलांसह गेल्या २५ वर्षांपासून स्थायिक असून, ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

शनिवारी सायंकाळी घरात चालू असलेल्या कुलरला चार वर्षीय विक्की लक्ष्मण कासदेकर याने स्पर्श केला. कुलरमध्ये आधीच विद्युतप्रवाह असल्यानं त्याला तीव्र शॉक बसला. मुलाचा आक्रोश ऐकून त्याची आई सुमती त्याला वाचवण्यासाठी धावली. मात्र तिलाही शॉक बसला आणि ती बेशुद्ध पडली. हे पाहून सहा वर्षीय श्वेता लक्ष्मण कासदेकर आईला बिलगली आणि तिलाही शॉक बसला.

या तिघांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळानंतर शेतातून परतलेल्या लक्ष्मण कासदेकर यांना ही भीषण घटना दिसली आणि त्यांनी टाहो फोडल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच सरमसपूरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.

या दुःखद घटनेमुळे संपूर्ण चमक बुद्रुक गावात हळहळ व्यक्त केली जात असून, गावकऱ्यांनी या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!