LIVE STREAM

AmravatiLatest News

अभिष्टचिंतन सोहळा पुरस्कार वितरण व वृक्ष वाटप अमरावती येथे संपन्न

अमरावती : धामणगाव रेल्वे येथील समाजसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक व पत्रकार यांचा भव्य पुरस्कार वितरण सोहळा अमरावतीच्या श्याम चौकातील जोशी हॉलमध्ये संपन्न झाला. या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन डॉ. मनीष गवई आणि सांध्य दैनिक मतदार राज चे संपादक विजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात समाजरत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, दर्पण पुरस्कार आणि आरोग्यसेवक पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धामणगावकरांचा गौरव करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी:
समाजभूषण पुरस्कार: प्रमोद कडू (निवृत्त शाखा अभियंता – अप्पर वर्धा प्रकल्प)

समाजरत्न पुरस्कार:

सौ. राधा गोपाल भुत
डॉ. सचिन करडे
सुशील मारवे
दीपक राठी
अमोल पंडित
मोहन बमनोटे
सौ. संगीता धोटे

पत्रकार संतोष वाघमारे
सुरेश ठाकरे (ग्रामगीता प्रचारक)
आरोग्य सेवक पुरस्कार:
डॉ. तेजस सोलंके
अंकुश डुंमरे

दर्पण पुरस्कार (पत्रकारिता):
सलमान खान
गोपाल परडके
निलेश रामगावकर
आदर्श शिक्षक पुरस्कार:
अश्फाक अहमद शेख लतीफ

या कार्यक्रमाला अनेक अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मान्यवर उपस्थित होते. सर्व पुरस्कार विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सुरेश ठाकरे यांच्या स्वागत गीताने तर समारोप राष्ट्रवंदना घेऊन करण्यात आला.

🌱 वृक्षवाटप उपक्रम:
कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षवाटप देखील करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!