LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावतीत अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश; ₹३.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : अमरावती शहर, गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिनांक १५ जून २०२५ रोजी गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, गुलिस्ता नगर परिसरातील युसूफ हॉलजवळ अवैधरित्या घरगुती एल.पी.जी. गॅस सिलिंडर ऑटोमध्ये भरले जात आहेत.

या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ गुलिस्ता नगर येथे छापा टाकला. छाप्यात त्यांना एका टीनाच्या शेडमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रिक गॅस रिफिलिंग मशीन आणि प्लास्टिक पाईपच्या मदतीने ऑटोच्या गॅस टाकीमध्ये गॅस भरताना आढळला. यावेळी दोन ऑटो गॅस भरण्यासाठी तेथे उभे होते.

या प्रकरणी शब्बीर खान इब्राहिम खान (वय ५२, रा. गुलिस्ता नगर, युसूफ हॉलजवळ) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील कारवाईसाठी नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, तेथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनास्थळावरून पोलिसांनी एकूण ३ लाख १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४ घरगुती भरलेले भारत गॅस सिलिंडर, ४ रिकामे भारत गॅस सिलिंडर, एक निओ कंपनीची गॅस फिलिंग मशीन, एक इलेक्ट्रिक वजन काटा आणि २ प्रवाशी ऑटो रिक्षा (MH 27/BW/0021 आणि MH 27/AF/3614) यांचा समावेश आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!