LIVE STREAM

Latest NewsNanded

दिव्यांग निधी खर्च न झाल्याने ‘भीक मांगो’ आंदोलन; खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर मोर्चा

नांदेड : नांदेड जिल्ह्यात दिव्यांगांसाठी राखीव खासदार व आमदार निधी खर्च करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ आज दिव्यांग बांधवांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. ‘भीक मांगो’ आंदोलन करत त्यांनी थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला.

या आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधवांच्या हातात प्लॅकार्ड्स होते, त्यावर “आमचा निधी कुठे गेला?”, “खासदार निधी आमच्यासाठी का नाही?” असे सवाल झळकत होते. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, मागील अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी राखीव असलेला खासदार व आमदार निधी वापरात आणला गेलेला नाही. त्यामुळे त्यांना विविध शासकीय योजना, आधार सेवा आणि आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत.

दिव्यांग संघटनांचे म्हणणे आहे की, निधी न दिल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल. तसेच, शासनाने दिव्यांगांसाठी ठेवलेला निधी पारदर्शक पद्धतीने खर्च केला जावा आणि याबाबत वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

प्रतिनिधी : मनोज मनपुर्वे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!