LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

आसेगाव पूर्णा येथे सामुदायिक श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण सोहळा संपन्न 🛕

पूर्णा : श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामुदायिक महापारायण सोहळा नुकताच आसेगाव पूर्णा येथे अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विशेष आकर्षण ठरली ती केवळ नऊ वर्षांची बाल पारायणकार कु. सुरभी भाग्यश्री सुनील ढगे (रा. पुणे). आपल्या सुमधुर वाणीने संपूर्ण विजय ग्रंथ मुखोद्गत स्वरूपात पार पाडत तिने उपस्थित भाविकांची मने जिंकली.

कोरोना काळात विद्याताई पडवळ यांचे यूट्यूबवरील पारायण ऐकत तिने अभ्यास सांभाळून केवळ सातव्या वर्षीच संपूर्ण विजय ग्रंथ मुखोद्गत केला होता. आसेगाव पूर्णा येथील सौ. अनुश्री निखिल ठाकरे यांच्या निमंत्रणावरून सुरभीने हे पारायण सेवा म्हणून सादर केले.

या सोहळ्यात एक हजारांहून अधिक महिला भक्तांनी सहभाग घेत विजय ग्रंथ वाचनात भाग घेतला. महिलांच्या सामुदायिक सहभागामुळे परिसरात अध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभावाची लहर निर्माण झाली होती.

  • कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती:
    संतोष महात्मे – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • दिलीप पाटील धोंडे, प्रकाश पाटील ठाकरे

मंच सेवेकरी – शीतल पुंड, प्रमोद कराळे गुरुजी, विजय गणवीर, वृषभ चुंभळे, शारदा भागवतकर, श्रेयस वैध

आयोजन आणि सेवा देणाऱ्यांचे योगदान:
महापारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी सुषमा बर्वे, आशाताई गोटे, सुनिता मानकर, संगीता साबळे, शारदा करडे, प्रणिता उपाशे, अर्चना बोबडे, शालिनी भोरे, रंजना भुजाडे, मीनाक्षी बोबडे, ज्योती वैद्य, सुचिता चिथोरे, उषा मोहोड, सौरभ दिवाण, राहुल डवरे, पंकज वैराळे, सुरज काटोलकर, सचिन भुयार, प्रवीण ठाकरे, वैभव बर्वे, गजेंद्र फुके, सचिन वाटाणे, शिवशंकर घुरडे, तेजस भुजबळ, आशिष अब्रूक, योगेश ठाकरे, संदीप मोहोड, अमोल इंगळे, दीपक ठाकरे, अतुल वैद्य, निलेश पुसतकर, नयन वैद्य, सतीश गोरखेडे, गिरीश बंड, रोशन लेंडे यांच्यासह निखिल ठाकरे मित्रमंडळ आणि परिसरातील श्री गजानन भक्तांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  • कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:
    बाल पारायणकार सुरभी ढगे हिचे सुमधुर पारायण
  • सामुदायिक पारायणात हजारो महिलांचा सहभाग
  • अध्यात्म, श्रद्धा व भक्तिभावाने भारलेले वातावरण

या महापारायण सोहळ्यामुळे आसेगाव पूर्णा गावात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये संत गजानन महाराजांप्रती निष्ठा आणि भक्तिभाव अधिक दृढ झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!