LIVE STREAM

JalgaonLatest News

जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार

चाळीसगाव तालुक्यात शेतातील झाडावर वीज कोसळून त्याखाली आश्रयाला थांबलेले एकाच कुटुंबातील तीनजण ठार झाले. या घटनेत इतर दोन जण जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना कोंगानगर येथे १५ जून रोजी दुपारी २ वाजता घडली.

दशरथ उदल पवार (वय २४), त्याचा पुतण्या दिलीप पवार (१४, दोघे रा. कोंगानगर) आणि शालक समाधान प्रकाश राठोड (९, रा. जेहूर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा अशी मृतांची नावे आहेत.

काही दिवसांपूर्वी झाले होते

लग्न मयत दशरथ याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. उदल गणपत पवार व दिलीप उदल पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पवार कुटुंबीय गावानजीकच्या शेतात रविवारी कपाशी लागवड करण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजता वादळी वाऱ्यासह पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे सर्वजण शेतातील झाडाच्या आडोशाला उभे राहिले. काही क्षणातच झाडावर वीज कोसळल्याने तिघे जागीच ठार झाले.

मन हेलावणारा आक्रोश

एकाच कुटुंबातील तीनजणांचा मृत्यू झाल्याने कोंगानगरात शोककळा पसरली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. रात्री उशिरा तीनही जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार संदेश निकुंभ, प्रथमेश मोहोड हे घटनास्थळी पोहोचले. आमदार चव्हाण यांनी शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीबाबतही प्रशासनाला सूचना दिल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!