LIVE STREAM

Latest NewsYavatmal

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून यवतमाळमध्ये ३०० शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप

यवतमाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बियाण्यांचे वाटप करण्यात आले. हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून गरजू शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मदतीचा हात देण्यात आला.

प्रत्येकी तीन एकर शेतासाठी बियाणे वाटप
या सामाजिक उपक्रमाअंतर्गत एका शेतकऱ्याला प्रति तीन एकर शेतासाठी ३ पाकीट कापूस बियाणे आणि २ पाकीट तुर बियाणे अशा स्वरूपात बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यवतमाळ मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार व जिल्हा नेते अनिल हमदापुरे यांच्या हस्ते वाटपाचे उद्घाटन करण्यात आले.

३०० शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ
मनसे जिल्हा नेते अनिल हमदापुरे यांनी माहिती दिली की, “या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ३०० शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, संपूर्ण हंगामात सुमारे ११०० शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. गेली **१५ वर्षे हा उपक्रम सलग राबवला जात आहे.”

या गावांतील शेतकऱ्यांना लाभ
या उपक्रमांतर्गत यवतमाळ तालुक्यातील इचोरी, तिवसा, वडगाव पोलीस स्टेशन, सावरगाव, चिचघाट, वाई हातोला, यवतमाळ ग्रामीण या परिसरातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

उपस्थित मान्यवर आणि शेतकरी
कार्यक्रमाला लकी छांगाणी, सोनू गुप्ता, तुषाल चोंडके, शिवम नांदुरकर, सौरभ अनसिंगकर, सुदर्शन शिंदे पाटील, आशिष सरूळकर, गोपाल घोडमारे, नीरज देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!