LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावतीत ई-सिगारेटवर पोलिसांचा छापा ४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

अमरावती : शहरात परदेशी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या अवैध विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तब्बल ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कॉटन मार्केट ते जयस्थंभ चौक मार्गावर सापळा रचून ही कारवाई केली.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल:
या कारवाईत क्रिष्णा नगर येथील जय लालचंद लोहानी याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी व विविध परदेशी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक सिगारेट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कलम २७५ सह कलम ३, ४, ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची चमकदार कामगिरी:
शहरातील युवकांमध्ये ई-सिगारेटच्या वाढत्या व्यसनाबाबत पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांनी अंमली पदार्थ व अवैध वस्तू विक्री विरोधात धडक कारवाईचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन पार पडलं.

कारवाईत सहभागी पथक:
सहायक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवाडे,
सहायक पोलीस उपनिरीक्षक विनय मोहोड, विनय गुप्ता,
पोलीस कर्मचारी: छोटेलाल यादव, अजय मिश्रा, मंगेश लोखंडे, मंगेश परिमल, संजय भारसाकळे, नईम बेग, चेतन कराडे, रुपेश काळे, लखन खुशराज, नरेश मोहरील, मयूर बोरकर, रामकृष्ण कांगडे

महत्त्वाचे:
शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी नकळत व्यसनाधीन होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, अशा विक्रीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे बनले आहे.
पोलीस प्रशासन आता अशा विक्रेत्यांविरोधात अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!