LIVE STREAM

AmravatiLatest News

बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या विद्यार्थीनींची टी.सी.एस. कंपनीमध्ये निवड कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विद्यार्थीनींचा सत्कार

बुलडाणा -येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये वाणिज्य विभागात शिकत असलेल्या आणि टाटा कन्सल्टन्सी सÐव्हसेस (टी.सी.एस.) या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ नुकताच महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगावच्या कॅम्पस मुलाखतीतून (कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह) टी.सी.एस.मध्ये निवड झालेल्या दोन विद्यार्थिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी कु. प्रियंका वैष्णव व कु. वैष्णवी पवार यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आजच्या स्पर्धात्मक युगात कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाने यश नक्कीच मिळते, हे या विद्यार्थीनींनी सिद्ध केले आहे. मॉडेल डिग्री महाविद्यालयाने नेहमीच विद्याथ्र्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांना व्यावसायिक जगासाठी तयार करण्यावर भर दिला आहे. आजचे हे यश त्याचेच फलित आहे, असे उद्गार याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. यावेळी टीसीएसमध्ये निवड झालेल्या विद्यार्थीनींनी सुध्दा आपले अनुभव कथन केले. महाविद्यालयातील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सेलने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, अधिष्ठता डॉ. मोना चिमोटे, श्री. मंगेश वरखडे, श्री शशिकांत रोडे, महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसणे, डॉ. कि.वा. वाघ उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!