Latest NewsMaharashtra
कोठारी येथील परीक्षा केंद्र संचालकावर पेपर फोडण्याचा आरोप; महागाव पोलिसात गुन्हा दाखल

काल जालना पाठोपाठ यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी येथे परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर वायरल झाली होती. दरम्यान शिक्षण विभागाच्या पथकाने तात्काळ चौकशी करून अखेर कोठारी येथील परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक शाम तास्के यांचे विरुद्ध महागाव पोलिसात गुन्हा दाखल केलाय. महागाव चे विस्तार अधिकारी शिक्षण, विजय बेतेवाड यांनी महागाव पोलिसात या गंभीर प्रकाराची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कलम महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 1982 नुसार कलम 5 तसेच 6 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.