ग्लॅमर आलियास मेकअप स्टुडिओच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा!

अमरावती :- आज आपल्यासाठी एक खास बातमी – अमरावतीत सौंदर्य आणि ग्लॅमर क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे! 21 फेब्रुवारी रोजी मोठ्या जल्लोषात ‘ग्लॅमर लियास मेकअप स्टुडिओ’चे भव्य उद्घाटन करण्यात आले. चला, पाहूया या शानदार सोहळ्याची खास झलक!
अमरावतीच्या सौंदर्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी! आळशी कॉम्प्लेक्स जवळील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये ‘ग्लॅमर आलियास मेकअप स्टुडिओ’चा भव्य शुभारंभ करण्यात आला. या स्टुडिओचे उद्घाटन माजी खासदार नवनीत राणा आणि इंटरनॅशनल एम.ए.यु. प्रशिक्षक संगीता प्रवीण आहूजा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या सोहळ्यात प्रमुख अतिथींसह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि टाळ्यांच्या गजरात संचालिका वैशाली आनंद चावंडे यांचे स्वागत केले. शहरातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
ग्लॅमर आलियास मेकअप स्टुडिओमध्ये महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे अॅडव्हान्स सर्विस, नॉन-केमिकल ट्रीटमेंट, मेकअप व्हरायटी, इंटरनॅशनल प्रॉडक्ट नॉलेज, हायड्रा फेशियल यासारख्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी नवनीत राणा यांनी स्टुडिओची पाहणी केली आणि उपलब्ध सेवांचे कौतुक केले. संचालिका वैशाली चावंडे यांनी महिलांना या स्टुडिओला भेट देण्याचे आणि अत्याधुनिक सौंदर्यसेवा अनुभवण्याचे आवाहन केले आहे.
अमरावतीतील सौंदर्य क्षेत्रासाठी हा एक मोठा टप्पा आहे! आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सेवांसह ‘ग्लॅमर आलियास मेकअप स्टुडिओ’ आता तुमच्या सेवेत हजर आहे. तुम्हीही या स्टुडिओला भेट द्या आणि नवनवीन सौंदर्यसेवेचा आनंद घ्या!