राजवीर संघटना आक्रमक – पालकमंत्री व जिलाधिकाऱ्यांना दिले निवेदन

अमरावती :- अमरावतीत राजवीर संघटनेने पुन्हा एकदा अन्यायाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जन्म प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पालकमंत्री आणि जिलाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
अमरावतीमध्ये राजवीर जनहित संघटना आक्रमक झाली असून, संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री आणि जिलाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, “जसा बोले तसा चाले” ही भूमिका घेत समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ते ठामपणे उभे राहिले आहेत.
अमरावती शहर व ग्रामीण भागात बांगलादेशी/रोहिंग्या शरणार्थी असल्याच्या तक्रारींवर प्रशासनाने चौकशी केली. मात्र, तपासात असे कोणतेही परदेशी नागरिक सापडले नाहीत. तथापि, काही मुस्लिम समाजातील नागरिकांच्या जन्म प्रमाणपत्रात किरकोळ चूक (काना-मात्रा) आढळल्याने, नायब तहसीलदार व तहसीलदारांच्या अहवालावर आधारित गुन्हे दाखल करण्यात आले.
राजवीर संघटनेने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना निवेदन देत मुद्दे मांडले:
पालकमंत्र्यांनी निवेदनाचा तातडीने विचार करून चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
राजवीर संघटनेच्या अध्यक्षांनी इशारा दिला आहे की, जर निर्दोष नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र थांबले नाही व दोषींवर कारवाई झाली नाही, तर संघटना तीव्र आंदोलन छेडेल.
यावेळी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनामुळे अमरावती शहरातील शांतताप्रिय जनतेत समाधानाचे वातावरण आहे आणि प्रशासन न्याय करेल, अशी त्यांची अपेक्षा आहे
याप्रकरणी पालकमंत्र्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले असले तरी पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन योग्य न्याय देईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज