LIVE STREAM

Latest NewsNagpur

डॉ. रविंदर कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटचे वाटप

नागपूर :- रस्ता सुरक्षा ही केवळ नियम न पाळल्यामुळे धोक्यात येते, हे सिद्ध करणारी घटना नागपूरमध्ये पाहायला मिळाली. हेल्मेट न घालण्यामुळे होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली १,००० पेक्षा अधिक हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमात नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. चला, याचा सविस्तर आढावा घेऊया.

रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत नागपूर पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे. नागपूर शहरातील व्हेरायटी स्क्वेअर आणि इतर १९ प्रमुख चौकांमध्ये सुमारे १,००० हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व पोलीस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी केले.

यावेळी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली. डॉ. सिंगल यांनी नागरिकांना हेल्मेटच्या महत्त्वाची जाणीव करून दिली आणि अपघातांपासून बचाव करण्यासाठी हेल्मेट घालण्याचे आवाहन केले.

रस्ता सुरक्षेसाठी कडक उपाययोजना राबवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर पोलिसांकडून वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्यास आपल्या जीवाचे रक्षण होऊ शकते. नागपूर पोलिसांनी घेतलेली ही मोहीम नागरिकांसाठी एक चांगला संदेश देणारी आहे. हेल्मेट वापरा, अपघात टाळा! वाहतूक नियम पाळणे ही फक्त जबाबदारी नसून आपले कर्तव्य आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी बघत रहा city news

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!