राष्ट्रीय सेवा योजनेचा गौरवशाली क्षण

अमरावती :- आज आपण बोलणार आहोत व्हीएमव्ही महाविद्यालय, अमरावती च्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत घेतल्या गेलेल्या विशेष उपक्रमांबाबत.
या योजनेच्या माध्यमातून चांगापूर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, कुमारी रेणुका तुळशीराम ढोणे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याबद्दल आणि त्यामागील प्रयत्नांबद्दल जाणून घेऊया सविस्तर
व्हीएमव्ही महाविद्यालय, अमरावतीच्या बीए आणि बीएस्सी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून चांगापूर येथे विशेष शिबिर आयोजित केले. या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, शासनाच्या योजनांबाबत जनजागृती शिबिरे, तसेच महिला सक्षमीकरण व गाव विकासाच्या उपक्रमांवर भर देण्यात आला.
या शिबिरात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कुमारी रेणुका तुळशीराम ढोणे हिला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, डॉ. मिलिंद काळे यांना राज्य शासनाने उत्कृष्ट एनएसएस समन्वयक म्हणून सन्मानित केले.
व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या टीमने शहीद येथेही विविध उपक्रम राबवले. सिटी न्यूजने या उपक्रमांचा विशेष आढावा घेतला आहे.
तर, व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमूने सामाजिक बांधिलकी जोपासत उल्लेखनीय कार्य केले आहे. अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये सामाजिक भान निर्माण होते आणि त्यांना एक सकारात्मक दिशा मिळते. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज.